पुणे – आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात जात असताना रस्त्यावर थांबून स्वच्छतादूतांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.
याबाबत आमदार पवार यांनी माहिती देताना ट्विटवर म्हटले आहे, की काल सकाळी विधीमंडळात जाण्यासाठी निघालो असताना रस्त्यात स्वच्छतादूतांची भेट झाली. त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या, त्यांचे काम आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा केली.
मुंबईच्या रस्त्यावरुन चालताना कमालीची स्वच्छता आपल्या डोळ्यात भरते. त्यामागे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची खूप मोठी मेहनत असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळं खऱ्या अर्थाने स्वच्छतेचे दूत कोण असतील तर ते हे कर्मचारी आहेत, मी नेहमीच या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आदर करत असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
www.sarkarnama.in/rohit-pawar-meets-employees-road-50110
