March 5th, 2020

तुमच्या समस्या सोडवणार; आमदार रोहित पवार यांचे मत्स्यव्यसाईकांना आश्वासन

मुंबई : मत्स्योद्योग विकास महामंडळाने गोदाम रिकामे करण्याच्या नोटिसा दिल्याने मत्स्य व्यावसायिक अडचणीत आले आहेत. यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात २०१५ मध्ये तोडगा निघूनही अंमलबजावणी झालेली नाही. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. ३) ससून डॉकला भेट दिली आणि मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.

ससून डॉक येथील सर्वांत जुन्या मासळी बाजाराला आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी भेट देऊन मच्छीमार, बोटवाले, व्यापारी, कामगार, ग्राहक यांच्याशी चर्चा केली. मत्स्य व्यावसायिकांचे काम बघायला गेलो होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी मत्स्य व्यावसायिकांची भेट घालून देऊ, असे त्यांनी सांगितले.
www.esakal.com/mumbai/rohit-pawar-promises-solve-problems-fisheries-268000