June 20th, 2020

सरकार अन रिक्षाही तिन चाकाचीच ! रिक्षा चालवून रोहित पवारांनी दिला हा संदेश

सरकार तीन चाकाचं आणि रिक्षाही तिन चाकाचीच. आमदार रोहित पवार यांनी रिक्षा चालवून आज अनुभव घेतला. रिक्षा चालवणं तर सहज सोपं असल्याचा अनुभव रोहित पवार यांनी ट्विटवर शेअर केला.

नगर : सरकार तीन चाकाचं आणि रिक्षाही तिन चाकाचीच. आमदार रोहित पवार यांनी रिक्षा चालवून आज अनुभव घेतला. रिक्षा चालवणं तर सहज सोपं असल्याचा अनुभव रोहित पवार यांनी ट्विटवर शेअर केला. तिन चाकाचं सरकार कसं चालणार, ही विरोधकांनी उपस्थित केलेली शंका फोल ठरल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

आमदार रोहित पवार यांनी आज कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे गेले होते. तेथे रिक्षा उभी असलेली पाहून त्यांनी सहज त्या रिक्षा चालकाशी संवाद साधला. परवडते का, कुटुंबाची उदर्निर्वाह रिक्षाच्या उत्पन्नावर होतो का, घरी कोणकोण असतं, अशी चाैकशी केली. या वेळी त्याच्याकडून रिक्षाची चावी घेवून ती चालवून पाहिली. सराईत रिक्षाचालकासारखी रिक्षा चालवून हे तर खूपच सोपं असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. या वेळी लोकांना पवार यांचे मोठे काैतुक वाटले.

तो अनुभव केला ट्विट

हा अनुभव ट्विवटवर शेअर करताना पवार म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं, तेव्हा हे तीन चाकांचं सरकार असून, ते कसं चालणार? अशी शंका विरोधकांनी उपस्थित केली होती. पण सरकारचा लोकांच्या हिताचा कारभार चांगला सुरू आहे. राहिला प्रश्न तीन चाकांच्या रिक्षाचा. तर ही रिक्षा चालवणंही सहजसोपं असून, याचा अनुभव आज मी माझ्या मतदारसंघात घेतला.

तीन चाकाची रीक्षा चालवून आमदार पवार यांनी ही गाडी चालविणे किती सोपे असल्याचे सांगितले. ट्विटरवर त्याला तिन चाकाच्या सरकारचा संदर्भ देऊन त्यांनी आपल्या मनातील शब्दांना वाट मोकळी करून दिली. सरकार चालवणंही सोपं आहे, असेच त्यांना त्यातून सांगायचंय. आगामी काळात आमदार पवार यांच्याकडे सरकारचे मोठे सूत्र मिळू शकतात, असा त्याचा अर्थ नेटिझन्सने लावून घेतला नसेल तर नवलच.

https://www.sarkarnama.in/rajya-nagar/government-and-rickshaws-also-have-three-wheels-message-was-given-rohit-pawar-driving