June 19th, 2020

शहराच्या विकासासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांना मी माझ्या सोबत घेणार -रोहित पवार

जामखेड (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष निखल घायतडक सह दहा नगरसेवकांनी माझ्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांचे मी स्वागत करतो. तसेच शहराच्या विकासासाठी व नागरीकांच्या हितासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांना मी माझ्या सोबत घेणार आहे असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

जामखेड नगरपरिषदेस शुक्रवार दि. १९ रोजी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार रोहित पवार त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवकांनी येथुन पुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी देखील त्या गोष्टीला समर्थता दाखवली या नंतर नगराध्यक्ष निखिल घायतडक व माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सदस्य सुर्यकांत नाना मोरे, उद्योगपती रमेश आजबे, माजी सरपंच सुनिल कोठारी, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक पवनराजे राळेभात, दिगांबर चव्हाण, शामिरभाई सय्यद, संदीप गायकवाड, भाऊराव राळेभात, गुलशन आंधारे, ऋषिकेश बाबंरसे, आर्शद शेख, सौ लताताई संदिप गायकवाड, सौ सुरेखा भाऊराव राळेभात, सौ सुमन अशोक शेळके, जेष्ठ नेते वैजनाथ पोले, उमरभाई कुरेशी, हरिभाऊ आजबे, मुख्याधिकारी सुहास जगताप, प्रकाश काळे, नगरसेवक फिरोज कुरेशी, विकास राळेभात, अमोल गिरमे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदेस पहील्यांदाच आमदार रोहित पवार यांनी भेट दिली त्यावेळी यांनी बोलताना सांगितले की मी कर्जत जामखेड मतदारसंघात निवडुन आलो तो आपण केलेल्या सहकार्यामुळे मी येण्याचे कारण म्हणजे नगरसेवकांनी माझ्या बरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. गेलेले नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडुन आले आहेत. इथल्या नागरीकांनी फक्त राष्ट्रवादी चिन्ह पाहीले पुन्हा परत गेलेले नगरसेवक पु्न्हा येत आहेत त्यांचे मी स्वागत करतो. जामखेड च्या विकासासाठी व लोकांच्या हितासाठी आपल्याला सर्वांना एकत्र मिळून काम करायचे आहे आसे देखील रोहित पवार यांनी सांगितले. जामखेड शहरासाठी ११६ कोटींची पाईपलाईन मंजूर केली निवडणूकीवेळी फक्त निवडुन येण्यासाठी सभेत पेपर दाखवला तो फक्त पेपरच होता आसा टोला माजी मंत्री प्रा राम शिंदे यांचे नाव न घेता त्यांना रोहित पवार यांनी लावला. तसेच शहरातील रस्त्यांचे नियोजन व्यवस्थित करायचे आहे. शहरातील पार्किंग, अंडरग्राऊंड गटारी, व शहराचे सुशोभिकीकरण ही महत्त्वाची कामे करायचे आहेत असे सांगितले.

या वेळी बोलताना नगरसेवक शामीरभाई सय्यद म्हणाले की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत रहाणार असुन आम्हाला आमदार रोहित पवार यांनी कसलेही अश्वासन दिले नाही आम्ही स्वतः हा निर्णय शहराच्या विकासासाठी घेतला आहे. तसेच नगरपरिषदेत काम करताना आमदार रोहित पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा नगरसेवकांना मान्य राहील तसेच आम्ही कुठल्याही अश्वासन दिल्या मुळे राष्ट्रवादी मध्ये आलो नाहीत असे स्पष्ट सांगितले.

https://www.dainikprabhat.com/i-will-take-with-me-those-who-will-come-with-me-for-the-development-of-the-city-rohit-pawar/