March 3rd, 2020

विकासकामांमध्ये लबाडी करणाऱ्या ठेकेदारांची गय करणार नाही, रोहित पवारांचा इशारा

अहमदनगर : कर्जत-जामखेड मतदारसंघातून माजी राज्यमंत्री राम शिंदे यांना चीतपट करून आमदार बनलेल्या रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकासकामांचा चांगलाच धडाका लावला आहे, परंतु हि कामे जर का दर्जेदार नाही झाली तर संबधित ठेकेदाराची आणि अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, महावितरण आणि जनजीवनाशी विविध विभागातील तक्रारी व समस्या जाणून घेण्यासाठी संबधित विभागाचे अधिकारी यांच्यातील जनता सवांद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठेकेदारांना कामात लबाडी केल्यास ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याचा इशारा देखील दिला. तसेच “मला निवडून देणारी जनता हि माझा तिसरा डोळा आहेत ते सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघ हा मला माझ्या स्वप्नातील मतदारसंघ बनवायचा आहे. येत्या काही दिवसात ज्या ज्या विभागातील तक्रारी आल्या आहेत त्या-त्या सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा” अशा दम देखील रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना भरला.

तसेच विकासाच्या मध्ये जो कोणी येईल त्याला आडवा करेल असा इशारा देखील यावेळी रोहित पवार यांनी विरोधकांना दिला यामुळे नेमेके रोहित पवार कोणाला आडवे करण्याची भाषा करत आहेत हे आगामी काळात कर्जत-जामखेड मतदारसंघात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
https://maharashtradesha.com/rohit-pawar-warns-to-contractors-at-karjat-jamkhed/