June 2nd, 2020

बॅकलॉगवाल्या विद्यार्थ्यांनो काळजी करु नका, महाविकास आघाडी तुमच्या बरोबर

अंतिम वषार्तील विद्यार्थ्याची परीक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतर बॅकलॉग विद्यार्थ्याचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. अशातच आमदार रोहित पवारांनी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक .ट्टिवट केले आहे.

अंतिम वषार्तील विद्यार्थ्याची परीक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केली. मात्र त्यानंतर बॅकलॉग विद्यार्थ्याचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला. अशातच आमदार रोहित पवारांनी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक .ट्टिवट केले आहे.
करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे शिक्षणाबाबतीत सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. त्यात पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र बॅकलॉग असलेले विद्याथी कसे करणार असा प्रश्‍न यातून निर्माण झाला आहे. अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलॉग राहिलेले असून त्यांची परीक्षा होणार की नाही, याविषयी काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे बॅकलॉगच्या विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. त्यावर आमदार रोहित पवार यांनी एक ट्टिवट केले आहे.

त्यात त्यांनी म्हटलं की, अंतिम वर्षाची परीक्षा रद्द झाली असली तरी बॅकलॉग असलेले अनेक विद्यार्थी मला फोन करत आहेत. पण काळजी करु नका, ‘मविआ’ सरकार तुमच्याबाबतीतही योग्य असाच निर्णय घेईल. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या परिक्षेबाबत निर्णय घेत असताना नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या परिक्षेबाबतही निर्णय घ्यावा, जेणेकरुन विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही आणि त्यांनाही दिलासा मिळेल असेही यावेळी पवार म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्याच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आतापर्यंत झालेल्या सेमिस्टर परीक्षांमधील गुणांच्या सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचा मार्ग मोकळा झाला. परंतु जे विद्यार्थी शेवटच्या सत्रात आहेत, पण त्यांचे गेल्या सत्रातील काही विषय राहिले आहेत, त्यांची परीक्षा होणार की नाही, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे.  अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची काही विषय राहिले आहेत. त्यांच्याबाबत काहीच निश्‍चित धोरण नाही. त्यामुळे बॅकलॉगच्या परीक्षेवरून विद्यार्थी चिंतेत आहेत.
बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्या अडीच लाख…
राज्य शासनाने अंतिम सत्र परीक्षा रद्द केले. मात्र एकूण परीक्षेच्या जवळपास 30 टक्‍के विद्यार्थ्यांचे काही विषय राहिले आहेत. त्याची संख्याही काही हजारांवर आहे. सुमारे 8 लाख विद्यार्थ्यांची सुरक्षिततेच विचार करून अंतिम सत्र करण्यात आले. मात्र बॅकलॉग विद्यार्थ्यांची संख्याही राज्यभरात सुमारे अडीच लाखांपर्यत असल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या परीक्षेचा काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे बॅकलॉग विद्यार्थी चिंतेत आहेत.

https://www.esakal.com/maharashtra/mahavikas-aghadi-will-make-right-decision-final-year-students-301486