June 10th, 2020

आता घाबरायचं नाही लढायचं, कोण म्हणालयं असं वाचा

सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला ‘मिशन बिगन आगेन’ हे नाव दिले. ३० जूनपर्यंत असलेल्या या लॉकडाऊनमध्ये अनेक शिथीलता आणली आहे.  मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन अनेकांच्या मनात भिती आहे. त्यामुळे सवलत देऊन सुद्धा अकेनजण बाहेर येत नाहीत. 

सरकारने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला ‘मिशन बिगन आगेन’ हे नाव दिले. ३० जूनपर्यंत असलेल्या या लॉकडाऊनमध्ये अनेक शिथीलता आणली आहे.  मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येवरुन अनेकांच्या मनात भिती आहे. त्यामुळे सवलत देऊन सुद्धा अकेनजण बाहेर येत नाहीत. जिल्ह्यांमध्ये एसटी सुरु होऊन सुद्धा बाहेर न पडल्याने मोकळ्या एसटी जात आहेत. करोनाच्या कठीणकाळात अनेकजण घरात बसून होते. आजही काहीजण घरातच बसून आहेत. खासगी आणि सरकारी कार्यालये,  स्टेडियम, क्रीडा संकुल,  सर्व दुकाने, मार्केटस नियम व अटी घालून सुरु करण्यात आल्या आहेत.
सरकारने एसटी प्रवासही सुरु केला आहे परंतु अद्यापही कुणीही प्रवास करताना दिसून येत नाही. एसटी रिकाम्या जात आहे. बऱ्याचं गोष्टी सुरु होत आहे. परंतु अनेक ठिकाणी संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन काळजी घेत महाराष्ट्राला उभं करण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. ट्विटमध्ये पवार यांनी म्हटलं की, ‘करोनाच्या भितीने अनेकांच्या मनात घर केलयं. पण आता ही भिती मनातून काढून घरात न बसता बाहेर पडूनच आपल्याला करोनाशी लढावं लागणार आहे. करोनाच्या नियमाचं शस्त्र हाती घेऊन आपण बाहेर पडलो तर आपल्यावर हल्ला करण्याची संधीच करोनाला मिळणार नाही. म्हणून बाहेर पडा काम करा, महाराष्ट्राला स्ट्राँग करा’.

जगभरात करोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. जानेवारी महिन्यापासून दिवसेदिवस करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. करोना साथीने मांडलेला हाहाकार कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.  याअनेक गोष्टींचा विचार करुन सरकार अनेक नवनवे उपाययोजना ही सुरु केल्या होत्या. एकानंतर एक असे लॉकडाऊन सुरु ठेवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन ५’ मध्ये अनेक निर्बंध हटविली आहेत. त्यांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यानुसार तब्बल ७२ दिवसांनी जगभरातील शहरे, गावांमधील बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.  या अनलॉकमध्ये बऱ्याच बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून करोनाने अनेकांच्या मनात घर निर्माण केले आहे. परंतु ती भिती अद्यापही गेली नाही. सरकार अनेक गोष्टी सुरु केल्या तरी पूर्ववत प्रमाणे लोक बाहेर येतील की नाही.. त्यांच्यामनातील करोनाची भिती आणखीन किती दिवस घर करुन राहिल… पूर्वीचे दिवस पुन्हा कधी येतील..असे अनेक प्रश्‍न लोकांना पडत आहेत.
लॉकडाऊनमुळे जगभरातील कामगारांच्या हालअपेष्टा सुरु आहेत. या लॉकडाऊनच्या बंदीत सर्व उद्योगधंदे बंद होते. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. कॉस्ट कटिंग आणि पगारही कमी झाले. लॉकडाऊन शिथिलीकरणानुसार टप्या टप्याने सर्व सुरु केले जात आहे. शासनाने नियम व अटी घालून करोनामुळे जगभरातील सर्व खासगी आणि सरकारी कार्यालये,  स्टेडियम, क्रीडा संकुल,  सर्व दुकाने, मार्केटस सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी जाताना प्रत्येकांनी आपआपली काळजी आणि दक्षता घेवून सरकारने लागू केलेल्या नियमअटीं पाळल्या पाहिजेत. परंतु अनेकांच्या मनातील भिती आजही तितक्याच प्रमाणात असलेली दिसून येत आहे. करोना काळात म्हणजे गेल्या तीन-चार महिन्यांपासून अनेक लोकांचा रोजगार हिसकावला गेला आहे.  करोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे अर्थव्यवस्थाच अडचणीत आली. करोनामुळे खोळंबलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे. करोनामुळे झालेले आणि होणारे नुकसान कशाप्रकारे कमी करता येईल. या गोष्टीं समजून घेवून अनेकजण कामाला लागले आहेत.  करोनाच्या या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अनेकजण सज्ज होत आहेत.

esakal.com/maharashtra/ncp-mla-rohit-pawars-appeal-citizens-about-corona-virus-twitter-305270