September 6th, 2020

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा बिडी उत्पादनासाठी गैरवापर नको : रोहित पवार

मुंबई : पुण्यातील एक कंपनी ‘संभाजी बिडी’ नावाने बिडीचे उत्पादन करत असल्याची माहिती आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बिडीचे उत्पादन करणे योग्य नसून हा छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान असल्याच्या संतप्त भावना शिव-शंभूप्रेमींकडून व्यक्त होत आहेत.

संभाजी ब्रिगेडनेही या नावावर आक्षेप घेतला होता. आता, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या कंपनीला सूचना केल्या आहेत. संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करू नका, असे पवार यांनी सुनावले आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यात बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीला हे अक्षम्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करून संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, असे ट्विट रोहित यांनी केले आहे .

https://www.maharashtratoday.co.in/chhatrapati-sambhaji-maharajs-name-should-not-be-misused-bidi-production-rohit-pawar-twitter/