October 10th, 2020

तुमचा भाऊ म्हणून मी सदैव पाठिशी असेल : आ.रोहित पवार

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने तालुक्यातील कोव्हिड योद्धांचा सन्मान करण्यात आला.

कर्जत ( नगर) : ‘स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या कोरोना योद्धांनी लोकांची सेवा केली, हे भाषण करणे सोपे असते. मात्र लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष काम करणे अवघड असते. त्या सर्व कोरोना योद्धांना मी सलाम करतो. कोरोनाशी लढताना कोणतीही अडचण आली तर तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या  पाठिशी असेल, असे मत राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील विविध विभागाच्या कोरोना योद्धांच्या सन्मान सोहळ्यावेळी ते बोलत होते. कर्जत येथे वेगवेगळ्या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला. आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने तालुक्यातील कोव्हिड योद्धांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलिस, पत्रकार, वीज कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार आदींचा समावेश आहे.

कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाचीही पर्वा न करता प्रत्येक नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. कोरोना योद्धांनी केलेल्या कौतुकास्पद कामाला दाद म्हणून आ. रोहित पवारांनी आपला वाढदिवस कोरोना योद्धांमध्ये जाऊन व त्यांना सन्मानपत्र व कोरोनायोद्धा बॅगचे वाटप करून साजरा केला.

आ.पवार यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  त्या स्पर्धकांनाही यावेळी सन्मानचिन्ह देण्यात आले.

कोरोना योद्धे सन्मान समारंभावेळी पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी संदीप पुंड, गट विकासाधिकारी अमोल जाधव, नगरपंचायचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, सचिन सोनमाळी तसेच सर्व कार्यकर्ते व कोरोना योद्धे उपस्थित होते.

कोव्हिड  हॉस्पिटलसाठी २ लाखांचे आरोग्य साहित्य

पुणे येथील बालाजी इन्फ्रा प्रोजेक्टचे रामचंद्र जगताप यांनी कोव्हिड हॉस्पिटलसाठी लागणारे अतिदक्षता विभागातील तब्बल दोन लाख रुपयांचे आरोग्य साहित्य आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भेट म्हणून दिले आहे. या आगळ्या-वेगळ्या गिफ्टमुळे अनेकांना आधार मिळणार आहे.

https://www.esakal.com/ahmednagar/corona-warriors-karjat-taluka-were-honored-mla-rohit-pawar-357095