October 21st, 2020

खडसेंच्या प्रवेशावर आमदार रोहित पवार म्हणाले राष्ट्रवादीत आता भरती सुरु

भाजपला जय श्रीराम करुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे.

अहमदनगर : भाजपला जय श्रीराम करुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीतही उत्साहाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन खडसे यांचे स्वागत केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये नाराज होते. त्यांना गेल्या विधानसभेत उमेदवारी मिळाली नव्हती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्यात अनेकदा आरोप- प्रत्यारोप सुरु होते. भाजप सोडतानाही खडसे यांनी फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्यातील अनेक हेवे- दावे उघड झाले होते. त्यांच्यावर सतत अन्याय होत असल्याचे कार्यकर्तेही म्हणत होते. काही दिवसांपासून खडसे भाजपमध्ये नाराज होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. तर खडसे यांनीही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करत भाजपचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी याबाबत ट्टिव करुन म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते. WelCome एकनाथ खडसे साहेब!

भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटलं आहे की, एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये किंमत होती. तेवढे किंमत राष्ट्रवादीमध्ये मिळणार नाही. त्यांना राष्ट्रवादीत गेल्यानंतर नक्कीच पश्‍चाताप होईल. त्यांच्याबरोबर जे लोक जात आहेत, अशी वलग्ना केली जात आहे. मला वाटतं लोकमतातला कोणीही प्रतिनिधी त्यांच्याबरोबर जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढत आहे.

https://www.esakal.com/ahmednagar/eknath-khadse-ncp-entry-welcomed-mla-rohit-pawar-362000