August 3rd, 2020

वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवल्याने शेतकऱ्यांना खते मिळाली : आ. पवार

नगर – शहरासह जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सर्व शेतकऱ्याना खते-बियाणे चे वाटप वेळेवर करण्यात आले. वाहतुकदारांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवल्यामुळे शेतकऱ्याना खते वेळेवर मिळाली. करोनाच्या काळात या वाहतुकदारांची सरक्षणंची जबाबदारी महत्वाची आहे.

त्यामुळे कोविड संरक्षणार्थ मास्क, व सॉनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. वाहतुकदार, वाहनचालक हमाल यांना कोवीड 19 सरंक्षणार्थ नालेगाव येथे शरद ठाणगे ट्रान्सपोर्ट व नगर शहरातील वाहतुक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट चालकांच्या वतीने मास्क व सैनी टायझर वाटप करण्यात आले.

यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. संग्राम जगताप, माणिक विधाते, शरद ठाणगे, रमाकांत गाडे, संजय चोपडा, कपील पवार, संजय कोळगे, अभिजित खोसे, संतोष लांडगे, जॉय लोखंडे, भरत ठाणगे, करीम हुंडेकरी, कुरविंदर सिंग वाही, शिवाजी जगताप, सुनिल राठी, भगवान चव्हाण, सुधिर कुमार, दीनेश देसाई, किरण शेळके उपस्थित होते.

https://www.dainikprabhat.com/farmers-get-fertilizers-due-to-smooth-transport-system-b-pawar/