July 22nd, 2020

अजित पवारांच्या जन्मदिनी रोहित पवारांनी ‘हा’ फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

पुणे – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जन्मदिवस. दरवर्षी अजित पवार यांचा जन्मदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. यंदा मात्र जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातलं असून यामुळे स्वतः अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये अशी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे.

कोरोना संकटाच्या काळात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचं दिसतंय. कार्यकर्त्यांसोबतच अजित पवार यांना अनेक नेत्यांनी देखील ऑनलाईन शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील अजित पवारयांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत ट्विट करताना त्यांनी, “विकास कामांसाठी धाडसी निर्णय घेणारे उत्तम प्रशासक, अजातशत्रू व्यक्तीमत्व, शब्दाला जागणारा नेता आणि आपले लाडके व कार्यक्षम उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. लोकसेवेसाठी दादांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!” असा संदेश दिला असून या सोबतच अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

://www.dainikprabhat.com/happy-birthday-to-ajit-pawar-rohit-pawar-shared-this-photo/