September 27th, 2020

बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मी युवकांचा आवाज बनेन : रोहित पवार

बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून व्यक्त केले.

नगर : बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या आहे. या प्रश्नाकडे आपण केंद्र सरकारचे लक्ष वेधले असून, या प्रश्नाबाबत मी युवकांचा बनेन, असे मत आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्त ट्विटरवरून व्यक्त केले.

पवार यांचा उद्या (ता. 29) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आज ट्विटरवर बेरोजगारीच्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की बेरोजगारी ही देशातील भीषण समस्या असून, याकडं मीही वारंवार केंद्र सरकारचं लक्ष वेधलंय. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचं आवाहन मी केल्याने बेरोजगारी या सामाजिक प्रश्नावर तुम्ही आवाज उठवला, तर मला आनंदच होईल. याबाबतचे तुमचे ट्विट रिट्विट करून युवकांचा आवाज बनण्याचा मीही प्रयत्न करेन.

या ट्विटला अनेकांनी कमेंट दिल्या आहेत. आम्ही 32 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या मेगाभरतीमध्ये अर्ज करून 2 वर्षे होत आहेत. अजूनही कंपनी निवडीची प्रक्रिया देखील पूर्ण नाही झाली. याबाबत मेगाभरतीची परीक्षा करून युवकांकडे लक्ष द्यावे, अशी विनंती युवकांनी केली आहे.

https://www.sarkarnama.in/rajya-nagar/i-will-be-voice-youth-issue-unemployment-rohit-pawar-62641