रोहित पवार यांनी दिले संकेत
मुंबई – ज्या युवाशक्तीच्या जोरावर आपण महासत्ता बणण्याचं स्वप्न बघत होतो, आज तीच युवाशक्ती बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. याच मुद्यावरून आमदार रोहित पवार यांना एका बेरोजगार तरुणान प्रश्न विचारला असता ‘लवकरच सकारात्मक बातमी मिळेल’, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहे.
दरम्यान, ‘दादा, तुम्ही प्रत्येक पक्षाच्या आमदार-खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. रिप्लाय देतात पण ज्या बेरोजगार तरुणांनी/मजूरांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांच्या 72000 जागांच्या मेगा भरती विषयी विद्यार्थी तुम्हाला सारखं प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही गप्प का? असा सवाल एका बेरोजगार तरुणानं विचारला आहे.
यावर रोहित पवार ट्वीटकेले आहे की ,”मेगाभरतीचा शब्द आम्ही पाळणार आहोत. आतापर्यंत हे विचारण्याची वेळच तुमच्यावर आली नसती, पण आपण पाहत आहात की सरकार आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकट येतायेत. तरीही सरकारला युवांची काळजी आहे. लवकरच आपल्याला सकारात्मक बातमी मिळेल.’
https://www.dainikprabhat.com/mega-recruitment-will-happen-soon/