July 6th, 2020

आमदार रोहित पवारांची सिव्हील रुग्णालयाला पुन्हा मदत

जिल्ह्यात कोरोना व्हाचा प्रादुर्भाव वाढत असुन यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बारामती ॲग्रोच्या माध्यमातुन पुन्हा एकदा १००० चष्मे, १५० एन- ९५ मास्क व २००० कापडी मास्क नगर मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.

नगर : जिल्ह्यात कोरोना व्हाचा प्रादुर्भाव वाढत असुन यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे पुन्हा एकदा जिल्ह्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बारामती ॲग्रोच्या माध्यमातुन पुन्हा एकदा १००० चष्मे, १५० एन- ९५ मास्क व २००० कापडी मास्क नगर मेडिकल असोसिएशन व राष्ट्रवादी डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते प्रशासनाला देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. राज्यात गरजेनुसार लॉकडाऊनचा कालावधी वाढला तसा वेळेनुसार टप्प्याटप्प्याने आपल्या मतदारसंघाला मदतीचा हात आमदार पवार यांनी केली आहे. गरजू, शेतमजुर, भुमीहीन व आर्थिकद्रुष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांची भुक त्यांनी भागवली. सामाजिक बांधिलकी जपत कर्जत- जामखेड मतदारसंघातच नव्हे तर राज्याच्या आरोग्य विभागालाही बळकटी देण्याचे काम आमदार पवार यांनी केले आहे. राज्यात कोरोना यौध्यांना कोरोना सोबत लढण्यासाठी सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. मतदारसंघातील कोरोना योध्यांना कोरोनापासुन बचाव करण्यासाठी व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मास्क चष्मे, हॅन्ड ग्लोज देऊन मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये निर्जन्तुकीकरण औषधाची २ ते ३ वेळा फवारणी देखील करण्यात आली. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादर्भाव कमी करण्यासाठी शासकिय नियमांची अंमलबजावणी होणे देखील तेवढेच महत्वाचे असुन याचे पालन सर्व घटकांनी करणे गरजेचे असल्याचे मत आमदार पवार यांनी व्यक्त केले.

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-assisted-ahmednagar-civil-hospital-317304