October 19th, 2020

आमदार रोहित पवारांना वाटतयं दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होतील

कोरोनाने थैमान घातले असल्याने शाळा महाविद्यलये कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर : कोरोनाने थैमान घातले असल्याने शाळा महाविद्यलये कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरुन अनेकजण तर्क-वितर्क लावत आहेत. यातच कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरु होतील असा, अंदाज लावला आहे.

महाराष्ट्रात मार्चमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर त्यांने संपूर्ण राज्यात हातपाय पसरले. त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामध्ये आता शिथीलता आणत उद्योग- व्यवसाय सुरु केले आहेत. एसटीसह काही रेल्वे गाड्याही सुरु केल्या आहेत. मात्र, शाळा- महाविद्यालये अद्याप बंद आहेत. निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शाळा सुरु होण्याचे चित्र नाही. यावर अनेकजण वेगवेगळे अंदाज लावत आहेत. ऑनलाईन शाळा सुरु आहेत. मात्र, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सरकारकडून अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु आहेत. त्याप्रमाणे दिवाळीनंतर शाळाही सुरु होतील, असा अंदाज आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

सराफ तनुज यांनी ट्विट करत ‘कॉलेज सुरु होण्याबाबत पण निर्णय घेतला पाहिजे’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला ट्विट करुन आमदार पवार यांनी उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सुरक्षेचा विचार करुन सरकार शाळा- महाविद्यालयांबाबत योग्य वेळी निर्णय घेईल, असा विश्वास आहे. साधारणपणे दिवाळीनंतर हे होईल, असं वाटतंय.’

https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-tweet-about-starting-school-361130