August 5th, 2020

देशात राम मंदिर सोहळ्याची धुमधाम सुरू असताना रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई |  देशात राम मंदिर पायाभरणी सोहळ्याची धुमधाम सुरू आहे. अयोध्येत त्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. तर अशातच इकडे मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. (Ncp MLA Rohit pawar Meet Cm Uddhav Thackeray)

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन रोहित पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला पोहचले. यावेळी विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं तसंच त्यांच्या मागण्यांचं निवेदन देखील दिलं. (Ncp MLA Rohit pawar Meet Cm Uddhav Thackeray)

कोरोनामुळे एमपीएससीची परीक्षा पुढं ढकलावी तसंच एमपीएससीसाठी स्वतंत्र ऑफिस देऊन सदस्य संख्येत वाढ करावी व प्रलंबित मुलाखती पूर्ण करुन उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, कक्ष अधिकारी ते सहसचिवांच्या सेवा ज्येष्ठता याद्या सुधारीत कराव्यात, अशा मागण्यांचं निवेदन रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं. (Ncp MLA Rohit pawar Meet Cm Uddhav Thackeray)

याशिवाय मोटार वाहन निरीक्षक पदाच्या प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, शहरी भागासाठीही रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एखादी योजना आणावी, गट क सेवा पदांच्या परीक्षेचा प्रलंबित निकाल लावावा, गट ब व क मधील रिक्त पदे भरावीत हे प्रश्नही यावेळी त्यांनी मांडले. (Ncp MLA Rohit pawar Meet Cm Uddhav Thackeray)

कोरोना, शेती, उद्योग, बांधकाम क्षेत्र, वारकरी व पत्रकारांचे प्रश्न, इ-पास व शिक्षकांच्या प्रश्नांवरही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी यावेळी चर्चा केली. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना दिलं. (Ncp MLA Rohit pawar Meet Cm Uddhav Thackeray)

https://www.thodkyaat.com/ncp-mla-rohit-pawar-meet-cm-uddhav-thackeray/