October 13th, 2020

आईचं श्रमदान पाहून भारावले रोहित पवार

अनेकदा आपल्यावर बालपणापासून होणारे संस्कारच भविष्याची घडी बसवत असतात असं म्हटलं जातं. हे अगदी खरंही आहे. कर्जत जामखेड मतदार संघातील आमदार रोहित पवार यांची पोस्ट पाहून हेच लक्षात येत आहे.

आईचं श्रमदान पाहून भारावले रोहित पवार

राजकीय वर्तुळात राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि समाजहिताच्या कामांमध्ये हिरीरिनं सहभागी होणाऱ्या रोहित पवार यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला मिळालेले संस्कार आणि कुटुंबाकडून मिळालेला वारसा पुढ आणला आहे.

त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. ज्यामध्ये आईनं केलेल्या श्रमदानाला पाहून तेसुद्धा भारावल्याचं पाहायला मिळालं. ज्याबद्दल त्यांनी आईचे उपकार मानले.

दोन्ही शहरांतील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेत, त्यांच्याशी संवाद साधून स्वच्छतेसंदर्भातील जनजागृती त्यांनी केली. त्यासोबतच स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकाऱ्यांसोबत श्रमदानही केलं.

आईनं उचललेलं हे पाऊल पाहता रोहित पवार यांनी काही फोटो पोस्ट करत या माऊलीनं केलेल्या श्रमदानाबद्दल तिचे मनापासून आभार मानले. (सर्व छायाचित्रं- सोशल मीडिया)

https://zeenews.india.com/marathi/photos/ncps-karjat-jamkhed-mla-rohit-pawar-mother-sunanda-pawar-participated-in-cleanness-drive/537888