October 14th, 2020

आमदार रोहित पवारांच्या पुढाकरातुन कर्जत- जामखेड मतदारसंघात कांदा पीक परिसंवाद

शेती शाश्वत व्हावी, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता आमदार रोहित पवार यांनी वर्षभरापासून शेती क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व ‘वडील’ अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मदतीने कर्जत- जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एकामाघून एक उपक्रम राबविण्याचा ‘सपाटा’ लावला आहे.

जामखेड (अहमदनगर) : शेती शाश्वत व्हावी, शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, याकरिता आमदार रोहित पवार यांनी वर्षभरापासून शेती क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तीमत्व ‘वडील’ अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या मदतीने कर्जत- जामखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एकामाघून एक उपक्रम राबविण्याचा ‘सपाटा’ लावला आहे. त्यांचा प्रत्येक उपक्रम नाविन्य पूर्ण असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे.

यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाच्या माहिती अभावी होणारी परवड घसरलेली उत्पादकता थांबाव, त्यांना निश्चित दिशा मिळून उभारी मिळावी, त्यांच्या उत्पन्नात विक्रमी वाढ व्हावी, बाजारपेठेत पोहचून चांगले पैसे मिळावेत याकरिता कांदा पीक परिसंवादाचे अयोजन केले आहे.

यामध्ये कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना एक दिवसात दोन ठिकाणी तर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या दिवशी दोन ठिकाणी स्वतंत्र कांदा पीक परिसंवाद होत आहेत. हा परिसंवाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरेल, हे मात्र निश्चित!
शेतकऱ्यांची उत्पदकता वाढून आर्थिक बळकटी मिळावी यासाठी पवार पिता- पूत्रांचा वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहे. याकरिता दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची व दर्जेदार बीयाण्यांची ‘शिदोरी’ त्यांनी देऊन शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.
यावर्षी दोन्ही तालुक्यात लिंबू, डाळींब, आंबा, पेरु, संत्रा या वाणांना पसंती दर्शवत शेतकऱ्यांनी फळबागेचे क्षेत्र ही वाढवले आहे.

राहूरी कृषी विद्यापीठाबरोबरच बारामती कृषी विज्ञान केंद्राने सुधारित जातीची रोप (कलम) शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करून दिली. तसेच उत्पादकता वाढावी याकरिता खरीप- रब्बीच्या पेरणीसाठी दर्जेदार बीयाणांचा पुरवठा ही केला. तर शुक्रवार (ता. 15) व शनिवारी (ता. 16) रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राजगुरू नगर येथील कांदा- लसूण संशोधन केंद्रातील शास्रज्ञांच्या उपस्थितीत दोन दिवसीय कांदा पीक परिसंवाद होणार आहे.

परिसंवादाचा शुभारंभ शुक्रवारी (ता. 15) मिरजगाव (ता. कर्जत) येथे होणार असून सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 पर्यंत हा परिसंवाद चालणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3.00 ते 7. 00 या वेळेत तालुक्यातील कोरेगाव येथे त्याभागातील शेतकऱ्यांसाठी परिसंवाद होणार आहे. तर शनिवारी (ता. 17) जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता दोन ठिकाणी परिसंवाद होणार आहे. यामध्ये सकाळी 9.00 ते 1.00 या वेळेत आरणगाव (ता. जामखेड) येथे तर दुपारी 3.00 ते 7.00 यावेळेत झीक्री (ता. जामखेड) येथे दुसरा परिसंवाद होणार आहे.

परिसंवादाच्या निमित्ताने यांचे असेल उपस्थिती
आमदार रोहित पवार, अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजी जगताप, आत्मा प्रकल्प संचालक राजाराम गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रविण गवांदे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर (कर्जत), तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे (जामखेड) उपस्थित राहणार आहेत.

असा रंगणार कांदा उत्पादकांचा परिसंवाद
राजगुरूनगर येथील कांदा संशोधन केंद्रातील डॉ. विजय महाजन : कांदा बिजोत्पदन हा विषय घेऊन चांगल्या प्रतीचे शुध्द ‘बी’ तयार करण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगणार आहेत.

डॉ. शैलेंद्र गाडगे हे कांदा लागवडीचे सोपे व अधुनिक तंत्रज्ञान सांगून शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती देणार आहेत. तर सुरेश गावंडे हे कांदा लागवडीवरील प्रभावी कीड व रोग नियंत्रणा संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.यानिमित्ताने शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या फ्रश्नांची उत्तरे बारामती क्रषी विज्ञान केंद्रातील म्रदा शास्रज्ञ विवेक भोईटे हे देणार आहेत.

https://www.esakal.com/ahmednagar/onion-crop-seminar-karjat-jamkhed-constituency-initiative-mla-rohit-pawar-358715