July 4th, 2020

माजी मंत्री राम शिंदे यांना पितृशोक, रोहित पवारांकडून श्रद्धांजली

कर्जत |   माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांना पितृशोक झाला आहे. राम शिंदे यांचे वडिल शंकर बापु शिंदे यांचं वृद्धपकाळाने आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास निधन झालं आहे

शंकर शिंदे यांच्यावर उद्या सकाळी 10 वाजता चौंडी ता. जामखेड येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती स्वत: राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांच्या जाण्याने शिंदे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

राम शिंदे यांना पितृशोक झाला आहे हे समजताच आमदार रोहित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे तसंच त्यांना आदरांजली वाहिली आहे. शिंदे परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, अशी रोहित पवार प्रार्थना यांनी केली आहे.

रोहित पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, “भाजपचे नेते प्रा.राम शिंदे साहेब यांचे वडील शंकर बापू शिंदे (भाऊ) यांचं निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. शिंदे परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, अशी मी प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली”

https://www.thodkyaat.com/1ram-shinde-father-pass-away-rohit-pawar-condolence/