September 2nd, 2020

‘ती’ सुवर्णकन्या अन् आमदार रोहित पवार…

अतिशय खडतर परिस्थिती…घरी अठरा विश्वे दारिद्र…तरीही अशा घरात एक सुवर्णकन्या जन्माला येते आणि खेलो इंंडियात दोन सुवर्ण पदके कमावत घराचे नाव भारताच्या कानाकोपर्यात पोचवते अन्…

पुणे : नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यामध्ये कापरेवाडी गाव आहे. नगर जिल्हा म्हटले की दुष्काळी भाग. त्यातही नगरचा कर्जत-जामखेडचा परिसर म्हणजे अतिशय दुष्काळी पट्ट्यातील भाग. कापरेवाडी गावामध्ये एका खोपटात एक कुटुंब राहते. अतिशय खडतर परिस्थिती…घरी अठराविश्वे दारिद्र…तरीही अशा घरात एक सुवर्णकन्या जन्माला येते आणि खेलो इंंडियात दोन सुवर्ण पदके कमावत घराचे नाव भारताच्या कानाकोपर्‍यात पोचवते. तिचे नाव म्हणजे कुस्तीपट्टू सोनाली कोंडीबा मंडलिक. राष्ट्रवादीचे पदाधिकारी राकेश कोते यांनी ट्विट करत सोनालीला मदत करण्याची साद आपले नेते आमदार रोहित पवार यांना घातली. आमदार पवार यांनी देखील आपल्या पदाधिकार्‍याच्या हाकेला लगेचच प्रतिसाद देत सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

नगर जिल्ह्यात कापरेवाडी नावाचे छोटेशे खेडे आहे. या खेड्यात राहणारी सोनाली मंडलिक अतिशय हुरहुन्नरी आहे. सोनाली कुस्तीमध्ये मास्टर आहे. तिने खेलो इंडिया या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 2  सुवर्ण पदके मिळविली आहेत व इतर स्पर्धेतही अनेक पदके मिळविली आहेत. पण तिला परिस्थिती काही पुढे जाऊ देत नव्हती.

दरम्यान, सध्या ती घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव करत आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. पाच व्यक्तींचे कुटुंब आहे. कुटुंबाचा सगळा भार वडिलांवरती आहे. असे असतानाही ते मुलीला राष्ट्रीय पातळीवर भाग घेण्यासाठी तयार करत आहेत. स्वतः साठी घर नसतानाही गोठयात राहून खेळाची तयारी करून घेत आहेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या मुलीने भारताचं प्रतिनिधित्व करावे.

तसेच सोनाली सध्या श्री अमरनाथ विद्यालय कर्जत येथे बारावीचे शिक्षण घेत आहे. तिच्या या जिद्दीची व चिकाटीची योग्य ती दाखल घेऊन तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही. सोनालीची माहिती नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी राकेश कोते यांनी आमदार रोहित पवार यांना ट्विटरव्दारे दिली. या मागणीला आमदार पवार यांनी देखील तात्काळ प्रतिसाद देत त्या मुलीच्या पालकांशी संपर्क केला आणि त्या मुलीच्या पुढील सर्व प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली.

पदाधिरी विनंती करतो अन्…कापरेवाडी (ता. कर्जत जि. नगर) येथील कु.सोनाली कोडीबा मंडलिक हिने खेलो इंडिया या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 2 वेळा सुवर्ण पदक मिळवले आहेत. तसेच विविध स्पर्धेत ही अनेक पदक मिळवले आहेत. सध्या ती घरीच तयार केलेल्या झोपडीच्या तालमीत सराव करत आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असुन ही 5 व्यक्तीच्या गाढा हाकत असताना मुलीला राष्ट्रीय पातळीवर भाग घेण्यासाठी तयार करत असून स्वतः साठी घर नसताना ही गोठयात राहून खेळाची तयारी करून घेत आहेत. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या  मुलीन भारताचं प्रतिनिधित्व करावे. सध्या ती श्री अमरनाथ विद्यालय कर्जत येथे 12 वी चे शिक्षण घेत आहे. तिच्या या जिद्दीची व चिकाटीची योग्य ती दाखल घेऊन तिला आर्थिक पाठबळ मिळाले तर तिच्या स्वप्नांना नक्कीच भरारी मिळेल आणि ती भारताचे प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही.

आमदार पवार यांनी तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतल्याने तिच्या पंखांना बळ नक्कीच मिळणार आहे. तसेच ती आपल्या देशाचे नाव देखील रोशन करेल असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

https://www.esakal.com/pune/rohit-pawar-takes-responsibility-young-wrestler-sonali-mandlik-raining-340867