राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक अडथळे येत असल्याने रस्त्याच्या कामाबाबत गती मिळत नव्हती. त्यामध्ये भू-संपादन, काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका या रस्ता कामास अडथळा ठरत होत्या.
कर्जत: तालुक्यातून जाणाऱ्या नगर-सोलापर राष्ट्रीय महामार्ग क्र. 516 (अ) कामासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
गेल्या महिन्यातही बैठक घेऊन राष्ट्रीय महामार्गाच्या कामास येत असलेल्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्याच्या सूचना आ. पवार यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वच अधिकाऱ्यांकडुन योग्य कार्यवाही करण्यात आली आहे.गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी आता मार्गी लागल्या आहेत.
आता या रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या सर्व फाईल्स दिल्लीला पाठवण्यात येणार अाहेत. त्याची पूर्तता करून लवकरच रस्त्याचा प्रारंभ होणार असल्याचा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण प्रकल्प संचालक, कर्जत, श्रीगोंदे, नगर विभागाचे उपविभागीय अधिकारी, सहाय्यक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, नगर रचनाकार राजेश पाटील, वीज विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी, सीना व कुकडी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक अडथळे येत असल्याने रस्त्याच्या कामाबाबत गती मिळत नव्हती. त्यामध्ये भू-संपादन, काही गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या नलिका या रस्ता कामास अडथळा ठरत होत्या.
गेल्या महिन्यापूर्वीही आमदार पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग कामाचा आढावा घेत महामार्गाच्या कामात येत असलेल्या अडचणी जाणून घेत त्या अडचणी तात्काळ सोडवून महिनाभराच्या कालावधीत या रस्ता कामास गती देण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आता अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर महामार्गाच्या कामामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार आहे.
https://www.esakal.com/ahmednagar/rohit-pawars-re-meeting-nagar-solapur-road-331329