पुणे :
काल कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आजोबा व देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे राज्याच्या विविध भागांचा दौरा करत आहेत. यावेळी रोहित यांनी राज्यात करोनाचं संकट असून तुम्ही राज्यभर दौरे करत आहात, त्याची काळजी वाटते, असं पवारांना सांगताच शरद पवारांनी स्पष्ट केले की, सरकार काम करतंयच पण लोकांची भीती घालवणं व काही ठिकाणची परिस्थिती प्रत्यक्ष पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे मी फिरतो.
यावेळी रोहित यांनी या वयातही (वय वर्षे – ७९) राज्याच्या दौरा करणाऱ्या पवारांना हॅट्स ऑफ साहेब म्हणून सलामही केला आहे. ‘जनतेच्या हितासाठी तुम्ही राज्यभर फिरणारच आहात. याबाबत कुणी नाही म्हटलं तरी तुम्ही ऐकणार नाहीत. म्हणूनच लोकांना विनंती आहे की, पवारांना भेटत असताना आपण स्वत:हून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं’, असं रोहित यांनी २ दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.