अहमदनगर :
सध्या करोनाबाबत अनेक अफवा, अपप्रचार चालू आहेत. अशातच सध्या एका चर्चेने जोर धरला आहे. ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला करोना नसेल तरीही तिला करोना पॉजीटिव्ह दाखवले तर डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलला पैसे सरकारकडून मिळतात. त्यामुळे अनेकदा एखाद्याला लक्षणे नसतील तर त्याचा रिपोर्ट करोना निगेटिव्ह येतो पण ते पॉजीटिव्ह दाखवतात आणि सरकारकडून पैसे मिळवतात. या चर्चा जोरात सुरु असताना युवा आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, ते सांगितले आहे.
पवार म्हणाले की,’काही ठराविक संस्थांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून कोरोनाची तपासणी करताना निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह दाखवलं जातं’, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. यात तथ्य नसल्याने त्यावर विश्वास ठेवू नये. उलट काही त्रास होत असेल तर तातडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करुन घ्यावी.