July 13th, 2020

म्हणून रोहित पवारही ‘त्या’ अधिकाऱ्यांवर उखडले..!

अहमदनगर :

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तरुण आमदार रोहित पवार यांच्या कामाची पद्धत आणि वेग अफाट आहे. वेळोवेळी याची कर्जत-जामखेडकरांना प्रचीती येते. आजही पुन्हा एकदा पांढरेवाडी-खर्डा रस्त्याच्या प्रकरणावर त्याचीच प्रचीती मतदारांनी घेतली आहे.

अवघ्या महिनाभरापूर्वी केलेल्या पांढरेवाडी-खर्डा या रस्त्यामध्ये काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात अशी दुर्दशा झाल्याकडे कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांचे लक्ष वेधले. त्यांनीही या रस्त्याची पाहणी करण्यसाठी कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून प्रवास केला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावर ठोस कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी लगोलग दिल्या आहेत. रस्ता उखडल्याची दखल घेऊन आमदार अधिकाऱ्यांवर उखडले अशीच चर्चा सध्या तिकडे सुरू आहे.

याबाबत त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सार्वजनिक कामाची अचानक पाहणी करण्याची माझी सवय आहे. संबंधित काम योग्य नसेल तर ते मला पटत नाही. कालही पांढरेवाडी-खर्डा या रस्त्याची पाहणी केली. महिन्यापूर्वीच केलेला हा रस्ता उखडण्यास सुरुवात झालीय. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असून काम दर्जेदार करण्याची सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिली.

http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/13/15353/