July 22nd, 2020

शरद पवारांचे अभिनंदन करताना रोहित पवार म्हणाले, नातू व पक्षाचा कार्यकर्ता म्हणून…

अहमदनगर :

आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी ११ वाजता राज्यसभा खासदार म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत शपथ घेतली. यावरून आजोबांचे अभिनंदन करताना युवा आमदार रोहित पवार म्हणाले की, आदरणीय साहेब आपलं मनःपूर्वक अभिनंदन!नातू व पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपला अभिमान आहेच.

पुढे ते म्हणाले की, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी जात असताना संपूर्ण सभागृहाने केलेला टाळ्यांचा कडकडाट हा आपल्या कर्तृत्वाला व उंचीला सभागृहाच्या माध्यमातून अवघ्या देशाने केलेला सलाम असल्याचंच निदर्शक आहे.

राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यावर शरद पवार यांनी ट्वीट करत सांगितले की, या सदनाची गरिमा जपण्यासाठी आणि जनतेचा प्रतिनिधी म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक बजावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

http://www.krushirang.com/maharashtra/2020/07/22/16371/